गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण वाचवाचा देण्यात आला संदेश; वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडे लावा झाडे जगवा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । जळगाव शहरातील जय जगदंबा गणेश मित्र मंडळातर्फे यंदा वनरक्षक बाप्पाची आरास साकारण्यात आली असून झाडे लावा झाडे जगवा याचा संदेश मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजनची गरज भासली असून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव जाऊ शकतात, मात्र आपण जर पर्यावरणाचा ऱ्हास राखला तर पर्यावरण टिकेल तर जग टिकेल असा संदेश या वृक्षारोपी झाडाच्या माध्यमातून असलेल्या मातेने चिमुकल्याला कड्यावर घेत गणपती बाप्पाच्या माध्यमातून यावेळी जय जगदंबा मित्र मंडळातर्फे यंदा देण्यात आला आहे.

मंडळाचे हे यंदा 25 वर्ष असून मंडळाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष तुषार कोळी यांच्या नेतृत्वाखाली यंदाची कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये अध्यक्ष प्रदीप राजपूत, उपाध्यक्ष भावेश राजपूत, सचिव ज्ञानेश्वर कोळी, सहसचिव दादू कोळी, खजिनदार हितेश राजपूत आणि कार्याध्यक्ष रोहित राजपूत यांचा समावेश आहे.
मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख सल्लागार म्हणून जुगल पाटील, विकी राजपूत, कल्पेश राजपूत, अंकुश राजपूत , हर्षल राजपूत ,सचिन राजपूत, गणेश राजपूत, जितद्र राजपूत, प्रशांत राजपूत, महेंद्र राजपूत, भूषण राजपूत, रोहित राजपूत,राहुल राजपूत , प्रवीण राजपूत , उत्कर्ष सोनवणे, आणि व हितेश वाल्हे हे अनुभवी सदस्य कार्यरत आहेत. मंडळाचे सदस्य कुणाल राजपूत, स्वप्निल राजपूत, यश राजपूत आयुष राजपूत,भूषण सोनवणे, वीरेंद्र वाल्हे, विष्णू राजपूत, यज्ञराज राजपूत, मोहित राजपूत, मनिष शिंपी, पवन राजपूत, दुर्गेश राजपूत, ललित अट्रवाल आणि हेही विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतला असून, यंदाही विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. मंडळातर्फे दरवर्षी पर्यावरण आणि विविध उत्सव चे आयोजन देखील करण्यात येते. गेल्या २५ वर्षांपासून मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे












