⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंदाणे येथील तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.उ. येथील २२ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुंदाणे ते हनुमंखेडे दरम्यान रस्त्यावर घडली. वाल्मीक उर्फ दीपक अधिकार पाटील (वय २२) असे तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व पार्थिव शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालयात नेण्यात आला आहे. वाल्मीक पाटील यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंदाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी माेठी गर्दी केली होती. घरातील कर्ता व एकुलता-एक मुलाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली हाेती.

हे देखील वाचा :