हेडफोन लावून रेल्वेरूळ ओलांडणे जीवावर बेतले ; तरुणीचा जागीच मृत्यू

मे 25, 2022 2:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । कानात हेडफोन लावून रेल्वेरूळ ओलांडणे एका १९ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतले आहे. रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शिवाजी नगर जवळ घडली. स्नेहल वैभव उज्जैनकर (वय-१९) रा. धनाजी काळे नगर असे या मृत तरुणीचे नाव असून याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

snehal ujenkar

काय आहे घटना?
शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात वास्तव्यास असलेली स्नेहल ही शहरातील एका कॉसमॅटीक दुकानावर नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता.

जळगाव तहसील कार्यालयाजवळून शिवाजी नगरात जाण्यासाठी रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीसांनी तातडीने धाव घेवून मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now