गावठी कट्टा बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. असून राजपालसिंग ज्योतसिंग बडोले (वय २०,रा. उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी) असे संशयिताचे नाव आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

crime 8

मध्यप्रदेशमधून चोपड्याकडे गावठी कट्टा घेऊन येणार्‍या संशयिताला, सत्रासेन गावाजवळील तीन नाकाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित सत्रासेन गावाकडून चोपड्याकडे येत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सिमेला लागू असणार्‍या परिसरात गावठी कट्टयाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याचे दिसून येत असून पोलिसांनी अलीकडच्या काळात धडक कारवाई करून अनेकांना अटक केलेले आहे. यात आता ही नवीन कारवाई करण्यात आलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now