गांजाची तस्करी भोवली ; मुद्देमालासह तरुण चोपडा पोलिसांच्या जाळ्यात

फेब्रुवारी 24, 2025 12:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मागील गेल्या काही दिवसात चोपडा तालुक्यातून गांजा जप्तीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता अशीच आणखी एक घटना समोर आलीय. जिथे गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशाच्या एका तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अमित दिलीप बरडे (वय २२, रा. दोंदवाडे जोगवाडा, ता. नेवाली, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ३४ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

Tp 1 1

चोपडा ते धरणगाव मार्गावरील निमगव्हाण बसस्थानकाजवळ संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी एका स्कूटीस्वाराला थांबवले. पोलिसांनी संशयित आरोपी अमित दिलीप बरडे याची तपासणी केली असता, त्याच्याकडे एका पिवळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ७९,००० रुपये किंमतीचा ७ किलो ९१८ ग्रॅम गांजा आढळून आला.

तसेच, पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत ५५,००० रुपये किंमतीचा ५ किलो ५६५ ग्रॅम गांजा देखील सापडला. पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर (क्र. एमपी ४६- झेडसी ६४४३) स्कूटी आणि आयफोन १५ मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, तो गांजा कुठून आणला आणि कुणाला पुरवठा करणार होता, याचा तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment