५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा घेतला जीव; घटनेनं जळगावात खळबळ

मार्च 23, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात किरकोळ कारणांवरून होणारी गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीय.अशातच केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी तरूणाचा उपचारादरम्यान आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. नितीन नाना काळे (वय ३५, रा.जैनाबाद, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

नेमकी घटना काय?
शहरातील जैनाबाद परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेला नितीन काळे काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या चार दिवसांपासून सुट्टीच्या कारणाने तो जळगावमध्ये आलेला होता. रविवारी २२ मार्च रोजी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने पाचशे रुपये मागितले. मात्र पाचशे रुपये नाहीत म्हणून त्याने नकार दिला.याचा संशयित आरोपीला राग आला.

त्याने धारदार शास्त्राने नितीन काळे याच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी नितीन काळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी दि. २३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान किरकोळ कारणाने झालेल्या खुनामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले असून शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now