देवी विसर्जनाला गेलेला तरुण गिरणेत बुडाला

ऑक्टोबर 4, 2025 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मित्राच्या घरच्या देवीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला १९ वर्षीय तरुण गिरणा नदीपात्रात पाय घसरून वाहून गेल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली. हिमेश उर्फ राम संतोष पाटील (वय १९) असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने संध्याकाळपर्यंत शोधून घेऊन देखील तरुण सापडला नाही.

himesh patil

खोटे नगर परिसरातील दादावाडी मंदिराच्या मागे असलेल्या मयुरेश्वर कॉलनी रहिवासी व पाळधी येथील जिल्हा बँक शाखेतील कर्मचारी कविता संतोष पाटील या हिमेश व हितेश पाटील या जुळ्या मुलासह राहतात. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता त्यांचा मोठा मुलगा हिमेश पाटील हा कॉलनीतील तीन-चार मित्रासोबत गिरणा नदीवर देवीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता.

नदीपात्रात उतरून हिमेशने देवीचे विसर्जन केले. त्यानंतर त्याचा पाय घसरला. त्याला स्वीमिंग येत असल्याने त्याने पोहण्याचा प्रयत्न केला; परंतु मागून जोरात पाण्याचा लोढे येत असल्याने काही अंतर गेल्यावर त्याचा दम सुटला व तो पाण्याबरोबर वाहत गेला. हिमेश वाहून गेल्याचे लक्षात येताच आयुष महाजन या तरुणाने माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन विभागाने संध्याकाळपर्यंत तरुणाचा शोध घेतला. मात्र तरुण सापडला नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now