Amalner : बैलांसाठी गवत कापत असताना लागला विजेचा धक्का ; तरुणाचा मृत्यू

सप्टेंबर 25, 2023 3:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथे एका तरुणाचा बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडलीय. ज्ञानेश्वर बापू कोळी (वय ३३) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

mungse news jpg webp

मुंगसे येथील ज्ञानेश्वर बापू कोळी हा सावखेडा रस्त्यावरील शेतात रविवारी गुरांसाठी चारा आणायला गेला होता. दरम्यान दुपारी दोन ते तीनच्या सुमारास गुरांसाठी गवत कापताना त्याला विजेचा धक्का लागला. विजेच्या धक्क्याने ज्ञानेश्वर कोळी हा शेतात पडला होता.

परिसरातील नागरिकांना ज्ञानेश्वर हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला उपचारासाठी चोपड़ा येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रात्री शवविच्छेदन करण्यात आले. ज्ञानेश्वर कोळी याचे अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण गाव पमव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now