⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

चितोड येथे तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । गणेश विसर्जनाच्याच दिवशी यावल तालुक्यातील चितोडा येथून एक दुःखत घटना समोर आलीय. येथील एका २५ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आलीय. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्या मागचे कारण अद्यापही समजू शकले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत असे कि, चितोडा येथील दुर्गेश किनगे या तरुणाने आज सकाळी जवळील शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुर्गेशच्या आत्महत्या मागील कारण अद्यापही समोर आले नाही. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि सगळ्यांसोबत हसतखेळत राहणाऱ्या दुर्गेशच्या आत्महत्येनं मित्र मंडळींना मोठा धक्का बसला आहे.