तीन महिन्यापासून पत्नी मुलांसह बेपत्ता ; तणावातून तरुणाने उचललं भलतंच पाऊल

ऑक्टोबर 24, 2023 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरातील रेणुकानगरात राहणाऱ्या ४२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष वामन भावसार (वय ४२) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

tarun succied jpg webp

नेमकी घटना काय?
जळगावातील रेणुकानगरातील संतोष वामन भावसार प्लम्बिंग काम करून ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी तीन महिन्यांपासून तीन मुलांसहित घर सोडून निघुन गेल्या आहेत. पत्नी गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संतोष कौटुंबिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान सोमवारी ते सकाळपासून घराच्या बाहेर पडलेच नाही. यामुळे शेजाऱ्यांनी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास संतोष भावसार यांना आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने घरात डोकाऊन पाहिले असता, ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. संतोष भावसार यांच्या बहिणींना माहिती दिल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now