Jalgaon : ठिबक कंपनीतील मजुराचा दुसरा मजल्यावरून पडून मृत्यू; मृत्यूप्रकरणी नातेवाईकांचा तीव्र संशय

मे 11, 2026 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका नामांकित ठिबक कंपनीत काम करणाऱ्या ३५ वर्षीय मजुराचा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक छगन भिल (वय ३५, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा, ह.मु. एस सेक्टर, जळगाव) असे मृत मजुराचे नाव असून या मृत्यूबद्दल मृत मजुराच्या नातेवाईकांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे.

crime bulding jpg webp

दीपक हा एमआयडीसी भागातील ‘एस सेक्टर’मधील एका ठिबक कंपनीत मजूर म्हणून काम करत होता. तो आपली पत्नी आणि तीन मुलांसह कंपनीच्या परिसरातच वास्तव्याला होता. शनिवारी, ९ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दीपक हा कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असताना रविवारी (१० मे) त्याचा मृत्यू झाला.

दीपकच्या पत्नीने घटनेची माहिती तिच्या सासरच्यांना दिली. त्याच्या मृत्यूबाबत शंका असून जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक, ग्रामस्थांसह लोकसंघर्ष मोर्चा, आदिवासी एकता परिषद या संघटनांनी घेतली. या शिवाय कोणताही माहिती न देता व आमच्या परवानगीशिवाय शवविच्छेदन केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. नातेवाईक आणि संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now