जळगावात क्रेनने महिलेला चिरडले, धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । क्रेनने ५३ वर्षीय महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना जळगाव एमआयडीसी परिसरात घडलीय. रंजना उत्तम येसे (वय-५३ रा. म्हाडा कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव असून थरार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी काय आहे घटना?

रंजना येसे या महिला मुलगा आणि सुन यांच्यासोबत जळगाव शहरातील म्हाडा कॉलनी येथे वास्तव्याला असून त्या कपडे इस्त्रीचे काम करतात. नेहमीप्रमाने त्या आज शुक्रवारी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून घरी पायी जात होत्या. यादरम्यान, MIDC परिसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक त्यांच्या मागून येणारा क्रेन क्रमांक (एमएच ४० पी २३०९) ने जोरदार धडक दिली. क्रेनने धडक दिल्यानंतर त्या जमीनवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

घटनेचा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी परिसरातील नागरीकांनी धाव घेतली होती. तर क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.