⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | आव्हाणी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

आव्हाणी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे भगवान पोपट पाटील यांच्या गावाबाहेरील खळ्यात बिबट्याने हल्ला करून गोन्हयाचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

या घटनेची माहिती आव्हाणी येथील सरपंच संगीताबाई सदाशिव पाटील यांनी वनविभागाकडे दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एच. लोढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर एच. ठाकरे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तसेच वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांच्याकडून घटनास्थळी टॅप कॅमेरे बसविण्यात आले. गावातील सर्व ग्रामस्थांनी बिबट्यापासून संरक्षण मिळावे अशी विनंती वनाधिकारी यांना केली व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून शेतकरीवर्गास रात्री शेतात एकटे न जाण्याचा सल्ला दिला. यावेळी सदाशिव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, ग्रा. पं. सदस्य सचिन पाटील, उपसरपंच दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह