‘अ…’ शाॅर्टफिल्म सर्वाेत्कृष्ट, देवगिरी फिल्म फेस्टिवलचा समाराेप

फेब्रुवारी 18, 2022 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । शहरातील डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ‘देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चा रविवारी समारोप झाला. यात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचे बक्षीस ‘अ…’ या फिल्मला मिळाले. उत्कृष्ट डॉक्युमेंट्रीत ‘मॅन इन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र’ अव्वल ठरली.

short film jpg webp

‘अ…’ या शॉर्ट फिल्ममध्ये ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी करावा लागणार संघर्ष’ आई-वडिलांचे भांडण, शिक्षणातही स्त्री-पुरुष भेदाभेद भावनाशील आणि प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. उत्कृष्ट माहितीपट (डॉक्युमेंट्री) रोहित चव्हाण यांच्या ‘मॅन इन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र’ हा ठरला. एकेकाळी भारताचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजी येथील सूतगिरणी कारखान्याची आणि कामगारांची व्यथा मांडण्यात आली आहे. कामगारांना करावा लागणारा संघर्ष या माहितीपटातून श्रोत्यांसमोर आला. विजेत्या स्पर्धकांना लेखक, दिग्दर्शक व आयफा ज्युरी आकाशादित्य लामा, प्राचार्या डॉ. गौरी राणे, प्रमोद बापट, डॉ जयंत शेवतेकर, स्वानंद झारे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. महोत्सवातील शॉर्ट फिल्म एकाहून एक सरस ठरल्या.

हे बक्षिसाचे मानकरी : ऍनिमेशन प्रकारात उत्तेजनार्थ बक्षीस आब्रू, पवन पाटील (चोपडा) यांना मिळाले. उत्कृष्ट पटकथा : कविता : अमर मारूती, उत्कृष्ट प्रकाश योजना : मधमाशी : प्रल्हाद रौदळ, उत्कृष्ट संकलन : टँकर : अनुप धीमान, उत्कृष्ट बालकलाकार : चित्रकार : आर्यन पाटील, उत्कृष्ट अभिनेता : तासिका : जगदीश जाधव, उत्कृष्ट अभिनेत्री : अ….. :वैशाली दाभाडे, उत्कृष्ट दिग्दर्शक : तासिका : शेख असलम युनूस

यांना मिळाली बक्षिसे
सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म : अ… : दिग्ददर्शक शंकर यशोद, सुनील अहिरे. द्वितीय : ‘कविता’ : दिग्दर्शक चैतन्य कांबे, स्नेहल कांबे. तृतीय : ‘होप वे’ : दिग्दर्शक रावसाहेब सातव, प्रियंका वाघमारे. उत्तेजनार्थ : ‘द पॉवर ऑफ एज्युकेशन’ : दिग्दर्शक मिलींद पाटील, शिवराज पाटील. कॅम्प्स फिल्ममध्ये प्रथम : तासिका : दिग्दर्शक शेख असलम युनूस. द्वितीय : जिम्मेदार नागरिक बने : दिग्दर्शक रवीकुमार परदेशी. माहितीपटात
प्रथम : मॅन इन मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र तर द्वितीय क्रमांक ‘तेथे स्वर माझे जुळती’ने पटकावला.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now