⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वंचित बहुजन आघाडीतर्फे आगळे वेगळे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ एप्रिल २०२२ । माध्यमिक शाळेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार निवेदन देवून देखील कार्यवाही करण्यात आली नाही, वंचित बहुजन आघाडीतर्फे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना बांगड्या अन साळी चोळीचा आहेर देऊन आज निषेध व्यक्त करण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक योगेश धोंडू साळुंखे, मुख्याध्यापक यांचेसह संस्थाचालक यांनी शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, प्रशासनाला दि २८ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना आज निवेदन देण्यात आले. चौकशी समिती नेमून संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे डॉ. नितीन बच्छाव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, जितेंद्र केदार, वैभव शिरतुरे, ललित घोगले, राहुल सुरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.