वृद्धेच्या घरात चोरी करणाऱ्याला सुरतमधून अटक, मुद्देमाल हस्तगत

ऑगस्ट 28, 2023 5:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील तांबापूर परिसरात वृद्ध महिलेचे बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविणाऱ्या भामट्याच्या एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्याला सुरत येथून अटक केली असून त्याच्याकडून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

chori jpg webp

काय आहे घटना?
जळगाव शहरातील तांबापूर परिसरात तसलीमबी मोहम्मद सैय्यद (वय-६०) या महिला बकरीईदच्या निमित्ताने २६ जून ते ७ जुलै दरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४८ हजारांचा मु्देमाल लांबविला होता.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी संयशित आरोपी इश्तियाक अली राजीक अली याला सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (वय-५५) रा. तांबापूरा, अनिस हमीद शेख (वय-३१) आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिपक जगदाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे यांच्यासह आदींनी कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now