जळगाव जिल्हाजळगाव शहर

प्रशासन सज्ज ; जळगाव महापालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी 3055 कर्मचारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी बंद असून आता उत्सुकता आहे ती मतदान आणि निकालाची. उद्या म्हणजेच १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

palikeelection

जळगाव शहराच्या महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये १२ उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे.

जळगाव शहरामध्ये मागच्या १० ते ११ दिवसांपासून सुरु असलेला निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. यानंतर आता मतदान आणि मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर वखार महामंडळाच्या गोडाऊन मधून मतदानासाठी लागणारे ईव्हीएम मशीन व साहित्य वाटप होत आहे. जळगाव शहराच्या मतदान प्रक्रियेसाठी 3055 अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button