⁠ 
शनिवार, जून 15, 2024

शिकारीचा करत होता पाठलाग अन बिबट्या..!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ ।  आपल्या शिकारीचा पाठलाग करत असतांना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या निमगाव शिवारात घडली.

यांची माहिती वनविभागाला गांवक-यांच्या मार्फत कळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी वन्यजीव संरक्षक संस्था आपदा मित्र गोसेवक कर्यकर्ते सर्व भुसावळ यांच्या सहकार्याने उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्ग दर्शनाखाली म सहा. वनसंरक्षक उमेश बीराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर कु. कृपाली शिंदे, कु-हापानांचे वनपाल पी. एम. महाजन, वनरक्षक संदिप चौधरी, विलास काळे, सुनिल चिंचोले, आर. एस. सोनवणे, बी एन पाटील, नितीन खंडारे व योगेश दिक्षीत वनपाल संभाजी पाटील वनरक्षक गस्तीपथक . जळगांव व तुषार भोळे, नवाब पिंजारी तसेच वन्यजीव संस्थेचे विवेक देसाई वन्यजीव मानद रक्षक व विजय रायपुरे, सतीष काबळे यांच्या सर्वाच्या सहकार्याने पिंजरा आणून क्रेनच्या सहाय्याने विहीरीत सोडून बिबटयास जेरबंद करून पशुवैदयकिय अधिकारी तायडे यांनी तपासणी करुन त्यास वरिष्ट्याच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे सांगितले.

पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे 22 कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.