जळगाव जिल्हा हादरला ; निर्जनस्थळी नेऊन चौघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑक्टोबर 18, 2022 1:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आलीय. मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीला पाल येथे निर्जनस्थळी घेऊन ४ जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीतेला गर्भधारणा झाल्याने तिने गोळ्या घेवून गर्भपात केला. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

rape jpg webp

17 वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर पाल येथील निर्जनस्थळी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केला. रावेर येथे संशयित आरोपी रवि छपरीबंद याने त्याच्या घरी डांबुन ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. पिडीतेने स्वत:ची सुटका केल्यावर देखील या चार संशयित आरोपींनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर पिडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाल्याने तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला.

दरम्यान, पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त व्यक्तीसोबत लावून दिले. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवि छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे हे करीत आहेत.

दरम्यान, याच प्रकरणात रविंद्र भिकन छपरीबंद यांनी देखील पोलिसात फिर्याद दिली आहे. मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मगितल्याप्रकरणी एका तरुणीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now