तुझ्या आईचे दागिने आणले नाही तर ..धमकी देऊन अल्पवयीन मुलीला घरी बोलाविले अन्

जानेवारी 3, 2023 5:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२३ । १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथे घडलीय. याबाबत एकावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

jalgaon crime 6 jpg webp

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १५ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला गावातील तरुणाने त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर मुलीसोबतल अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला.

तसेच तु जर तुझ्या आईचे सोन्याचे दागिने आणले नाही तर मी गावात तुझी बदनामी करेल व माझ्या मोबाईल मधील फोटा व्हायरल करेल अशी धमकी देत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितेश राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories