पहूर येथील डबक्यात जिवंत साप

डिसेंबर 20, 2021 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । पहूर ( ता.जामनेर ) पेठेतील गोविंद नगरमध्ये साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून, दरम्यान, याठिकाणी दोन जिवंत साप आढळल्याने नागरिक भयभीत झाले त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित दखल घ्यावी,असे नागरिकांनी म्हटले आहे.

pahur talav jpg webp

सविस्तर असे की, पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोविंद नगर येथे रहिवास असलेल्या ठिकाणी भले मोठे पाण्याचे डबके साचले असून या पाण्याच्या धक्क्यामुळे डासांचा उद्रेक होत असून या डासांमुळे साथीच्या आजारांची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसापूर्वी याच परिसरात एक साप मारण्यात आला असून या डब्यातच असलेल्या सिमेंटच्या पाईपावर आजही दोन साप जिवंत आहेत परिसरात रहिवास असल्याने लहान-मोठे लोकांसह येणाऱ्या जाणाऱ्यांची या ठिकाणी वर्दळ असते. मात्र या सापानेमुळे परिसरात राहणारे लोक भयभीत झाले असून या सापांना बाहेर सोडून लोकांच्या जीवितास होणारी हानी टाळावी, अशी विनंती गोविंदा नगरातील रहिवाशांनी केली.तसेच साचलेले घाण पाण्याचे डबके तात्काळ बुजून डासांच्या होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी व साथीचे आजार होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी मागणी गोविंद नगरातील ग्रामस्थांनी केली आहे. तरी ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित दखल घ्यावी अण्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकास सामोरे जावे लागणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now