गुन्हे

आईसोबत सुरतला जाण्यासाठी निघालेली तरुणी रेल्वे स्थानकावरून बेपत्ता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । पटनाहून आईसोबत सुरत जाण्यासाठी निघालेली 19 वर्षीय तरुणी भुसावळ रेल्वे स्थानकावर बेपत्ता झाल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात तरुणी हरवल्याची नोंद करण्यात आली. रोशन शमी अहमद (19, मलोली गोसाईगंज, ता.मोहनलाल, जि.लखनऊ, उत्तरप्रदेश) ही तरुणी आपली आई सायरा बानो अहमदसोबत पटना येथून सुरत जाण्यासाठी 12 रोजी अप जनता एक्स्प्रेसने निघाली होती. भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवर तरुणी झोपल्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेवूनही तरुणी न आढळल्याने ती हरवल्याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली. उंची 160 सेंटीमीटर, रंगाने गोरी, सडपातळ, अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाचा पायजामा व पांढर्‍या रंगाचा दुपट्टा आहे. तरुणीबाबत कुणाला काहीएक माहिती असल्यास हवालदार आनंदा सरोदे (9823247299) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी पुरूषाचा मृत्यू
भुसावळ अप रेल्वे लाईनवर कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेल्वे खांबा किलोमीटर क्रमांक 446/13-15 जवळील अप रेल्वे लाईनवर 45 वर्षीय पुरूष रेल्वेखाली आल्याने मयत झाला. उंची 5.5 फूट, नाक बुटके, रंग गोरा, डोळे मोठे, शरीर बांधा मजबूत, डोक्याचे केस वाढलेले, चेहरा लांबट असे वर्णन आहे तसेच अंगात गोल गळ्याचा फुलबाहीचा टी शर्ट, नीळ रंगाची जीन्स पँट, हातात पिवळा धागा असे वर्णन आहे. मयताची ओळख पटत असल्यास हवालदार आनंदा सरोदे (9823247299) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
लग्नात मान-सन्मान केला नाही या कारणावरून शहरातील रहिवासी व चाळीसगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा मारहाण करून छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहिदा बी.सैय्यद इम्रान (19, काझी प्लॉट, पापा नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती सैय्यद इम्रान सै.फकीरा, सासू नजमा बी. सैय्यद फकीरा, सासरे फकीरा सैय्यद मोहम्मद, दीर सैय्यद सादीक सैय्यद फकीरा, नणंद आयशा सैय्यद फकीरा, नणंद आफरीन सैय्यद अकीरा (सर्व रा.नगरपालिका, वाल्मीक नगर, चाळीसगाव) यांनी शिविगाळ करीत करीत धमकी देवून मारहाण करीत छळ केला. तपास नाईक अर्चना अहिरे करीत आहेत.

Related Articles

Back to top button