
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । सुप्रिम कॉलनी परिसरातील शारदा माध्यमिक विद्यालयाजवळ विरु प्रेमसिंग राठोड हा तरुण मजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंग जवळ काही तरुण उभे होते. यातील सागर नावाच्या तरुणाने दारुच्या नशेत विरुला आमच्याकडे काय बघतो असे म्हणत त्याच्या हातातील दगड विरुच्या डोक्यात मारीत त्याला दुखापत केली. तसेच सागर सोबत असलेले शेख व इतर दोघांनी विरुला चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात विरु राठोडच्या तक्रारीवरुन सागर, शेखर (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) रा. कुसुबा ता. जळगाव व त्यांचे दोन साथीदार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील हे करीत आहे.









