किरकोळ कारणावरून तरुणावर फायटरने हल्ला

ऑक्टोबर 21, 2022 2:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील नाहाटा महविद्यालयाजवळील एका चहाच्या टपरीवर किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करीत शिविगाळ करण्यात आली तसेच फायटरने हल्ला करून जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

bhusaval 1 1

जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (32, अमरनाथ नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नाहाटा महाविद्यालयासमोरील ठाकूरच्या टपरीवर संशयीत हेमंत पैठणकर (विकास कॉलनीमागे, भुसावळ), सचिन दलाल (श्रद्धा नगर, भुसावळ) व शोले (नाव, गाव पूर्ण माहित नाही) यांनी शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच हेमंतने फायटरने हल्ला करून जखमी केले. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now