मुक्ताईनगर तालुक्यातील प्रेमी युगलाने घेतली रेल्वेखाली उडी, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील एका प्रेमी युगलाने आपले लग्न होणार नसल्यामुळे एकत्र मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिल. मात्र यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणी गंभीर जखमी आहे.

नेमकी काय आहे घटना?
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील उमेश मोहन तारू (वय २३) या तरूणाचे तालुक्यातील कुंड येथील तरूणीशी प्रेम होते. मात्र त्या तरूणाच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसरीकडे लाऊन दिला होता. तिकडे तिला त्रास सुरू झाल्यामुळे तिने याबाबत उमेश याला माहिती दिली.

यामुळे उमेश याने त्या तरूणीला ठाण्यावरून पुण्याला नेले. तेथून ते छत्रपती संभाजी नगर मार्गे घरी येण्यासाठी निघाले. तथापि, आपला विवाह होणार नाही असे स्पष्ट होताच उमेश आणि त्याच्या प्रेयसीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. मात्र यात दुर्दैवी उमेशचा मृत्यू झाला. तर त्याची प्रेयसी ही गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान, उमेश याने आत्मघात करण्याआधीच आपल्या मित्रांना याबाबतची माहिती मोबाईलवरून त्यांना धक्काच बसला. यानंतर काही वेळाने त्यांच्यासह आप्तांना ही माहिती मिळताच ते शोकसागरात बुडून गेले. या घटनेमुळे चांगदेव गावावर शोककळा पसरली असून उमेशबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.