तारखेडा येथे बंद घर फोडले ; ६८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लंपास

ऑक्टोबर 26, 2021 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । तारखेडा ( ता. पाचोरा ) येथे देवचंद संतोष कोळी ( वय-४१ ) यांच्या बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने  सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, देवचंद संतोष कोळी (वय-४१) रा. तारखेडा ता. पाचोरा हे शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते कुटुंबियांसह शेतात कामाला गेले. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे टोंगल, सोन्याचे टॉप, सोन्याचे पतकी आणि २३ हजार ६०० रूपयांची रोकड असा एकुण ६८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार दुपारी १ वाजता उघडकीला आला.

याप्रकरणी देवचंद कोळी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now