कुर्‍हात भरधाव दुचाकीच्या धडकेत बालकाला जखमी

ऑक्टोबर 27, 2022 12:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथे फटाके फोडत असलेल्या बालकाला भरधाव दुचाकीने उडवल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

रवींद्र ओमप्रकाश डालमिया (48) यांचा मुलगा सर्वश रवींद्र डालमिया (11) हा गल्लीत सोमवारी रात्री फटाके फोडत असताना संशयीत आरोपी अभिषेक भगवान इंगळे (कुर्‍हा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.19 बी.एल.6558) भरधाव वेगाने चालवत सर्वशला धडक दिल्याने त्याच्या हाता-पायाला मोठी दुखापत झाली आहे. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now