यावल तालुका हादरला ; केळीच्या शेतात नेत मुलीवर केला वारंवार अत्याचार, पीडित मुलगी गरोदर

ऑक्टोबर 2, 2022 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या थांबतच नाहीय. जळगाव जिल्ह्यात मुलीवर झालेल्या अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील किनगाव शिवारात ही घटना घडली असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

crime 2022 06 03T140339.172 jpg webp

किनगाव शिवारात असलेल्या केळीच्या शेतात नेत फिर्यादी १९ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. यातून १९ वर्षीय मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी रहेमान मनिराम तडवी याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
संशयित आरोपी रहेमान तडवी याने फिर्यादी हि तिच्या वाड्यातील बायांसोबत शेत मजुरीसाठी कामासाठी किनगाव येथे शेतात जात होती. तेव्हा तिची यातील आरोपी सोबत ओळख झाली व ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर आरोपी याने तिच्याशी ओळख वाढवुन प्रेमसंबंध निर्माण केले. फिर्यादीस धमकी देवुन तिला जबरदस्ती केळीच्या शेतात घेवुन जावुन तिच्या मर्जिविरुध्द फिर्यादीवर वारंवार अत्याचार केला असून सदर फिर्यादी सध्या गरोदर आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासी अंमलदार पो. उप निरीक्षक सुदाम काकडे नेम. यावल पो.स्टे. हे आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now