महिलेला आधी लग्नाचे आमिष दाखविले, नंतर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन ठेवले शारीरिक, अन्.. फैजपुरात गुन्हा दाखल

जुलै 2, 2023 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । सध्या मुलींसह महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून समोर आलीय. प्रेम संबंध स्थापित करून महिलेला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन अत्याचार करून तिला गर्भधारणा झाल्यावर गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

crime rep jpg webp

नेमकी काय आहे घटना?
रावेर तालुक्यातील वडगाव येथील राहणाऱ्या एका व्यक्तीने 2017 ते 2018 आज पर्यंत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर फैजपूर,भुसावळ, जळगाव अशा अनेक ठिकाणी लॉजवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला असून यात याने पीडीतेशी सुरुवातीला प्रेम संबंध स्थापित करून नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

यात पीडित महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर तिला आयुर्वेदिक गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केल्याचाही प्रकार आरोपीने केला. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस स्टेशनला रात्री फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्याविरुद्ध फेसबुक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक एमजे शेख करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now