बेकायदेशीर पोस्टर, बॅनर लावणे भोवले ; शनिपेठ, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जानेवारी 25, 2023 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील महापालिकेसमोर व सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर पोस्टर व बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

शहरातील महापालिका इमारतील समोरील मुख्य रस्त्यावर राजेश भगवान राजवाणी (वय-४२) रा. आदर्श नगर, जळगाव याने बेकायदेशीररित्या पोस्टर लावून शहरातील विद्रुपीकरण केल्याचे समोर आले. पोलिसांच्या पथकाने कारवाई करत रस्त्यावर लावलेले पोस्टर काढून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महापालिका कर्मचारी ईश्वर ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश भगवान राजवाणी रा. आदर्श नगर, याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ संजय बडगुजर करीत आहे.

बॅनर लावून केले शहराचे विद्रुपीकरण
शहरातील नेताजी सुभाष चौकातील एका इलेक्ट्रीक खांब्यावर जाहीरातीचे बॅनर विनापरवाना लावण्यात आले होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी कारवाई करीत बॅनर हटविले. महापालिकेचे लिपीक अजय बिर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात निलेश संजय बाविस्कर रा. भवानी पेठ, जळगाव आणि कमलेश प्रभाकर महाजन रा.नशिराबाद, या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ रविंद्र पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now