पाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीला धमकी; माझ्याशी लग्न कर, अन्यथा.., तरुणावर गुन्हा दाखल

जुलै 28, 2023 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार वाढत असून यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पाचोरा शहरातुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस माझ्याशी लग्न कर माझ्यासोबत चल अन्यथा तुझ्या अंगावर ऍसिड टाकून देईल अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

crime 12 jpg webp

काय आहे प्रकार?
पाचोरा शहरातील एका परिसरात असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. मुलगी शाळेत जात असताना नियमितपणे तरुण तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्या शाळेजवळ तिला थांबवत माझ्याशी लग्न कर व तू माझ्यासोबत चल नाहीतर मी तुझ्या अंगावर एसिड टाकून देईन अशी वारंवार धमकी दिली.

तसेच हिच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्या प्रकरणी तिने घडलेली घटना आईला सांगितल्यानंतर पाचोरा पोलीस स्थानकात संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हे करीत आहे याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now