अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचा इन्स्टाग्रामचा आयडी मागून विनयभंग ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

सप्टेंबर 13, 2023 2:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा इन्स्टाग्रामचा आयडी मागून विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 12 jpg webp

अल्पवयीन विद्यार्थ्यांनी एका महाविद्यालयात शिकत असून १२ सप्टेबर मंगळवार रोजी विध्यार्थीनी ही आपल्या मैत्रीणींच्या सोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विध्यार्थी तिच्या जवळ येवून तिला ”तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे” अशी मागणी केली असता विध्यार्थीनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले.

यावेळी विध्यार्थ्याने लज्जा उत्पन्न होईल असे बोलला असता तेव्हा विध्यार्थीनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला तुला महाविद्यालय ईमारती वरून खाली टाकण्याची धमकी दिली आहे. या अनुषंगाने यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now