बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! मुलीची बापाविरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मे 22, 2023 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रावेर तालुक्यातून समोर आलीय. बापाने आपल्या १३ वर्षीय मुलीसोबत चुकीचे कृत्य केलं. याबाबत मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात बापाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 12 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह राहायला असलेल्या १३ वर्षीय मुलगी दि २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरात भांडी घासत असतांना घरात असलेल्या बापाने मुलीस बळजबरीने ओढून तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सावदा पोलिसात सांगितल्याने आरोपी बापाविरोधात अत्यचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now