---Advertisement---
पारोळा

पारोळ्यात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथे गुरुवारी रात्री विद्युत खांबावरील तार तुटल्याने म्हशीच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पशुवैद्यकीय अधिकारी योगेश देशमुख यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले.

parola 1 jpg webp

येथील गोविंद रणजित जाधव यांच्या मालकीची म्हैस त्यांच्या अंगणात नेहमीप्रमाणे बांधलेली होती. गुरुवारी रात्री झालेल्या पावसात सुमारे एक वाजेच्या सुमारास विद्युत खांबावरील जीर्ण झालेला तार तुटल्याने तो म्हशीच्या अंगावर पडला. त्यातच तिचा जागेवर मृत्यू झाला. त्यामुळे गोविंद जाधव यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

---Advertisement---

कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे सर्वसामान्य माणसाचे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तलाठी गीतांजली पाटील यांनी पंचनामा केला तर पशुवैद्यकीय अधिकारी योगेश देशमुख यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---