⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

डॉक्टरच्या नावाने सराफाला ५० हजार रुपयांचा गंडा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । मी असिस्टंट डाॅक्टर बाेलत असून माझ्याकडे कार्यक्रम असल्याने चेन घेवून रुग्णालयात ये असे फाेनवरुन सांगितले. त्यानुसार साेन्याच्या दुकानातील कामगार साेन्याची चेन घेवून तेथे पाेहाेचल्यानंतर अज्ञात व्यक्तीने चेन घेवून धूम ठाेकल्याचा प्रकार चाळीगाव शहरात ७ रोजी सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी कामगाराच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर घटना अशी की, चाळीसगाव शहरातील रथगल्ली येथील मयूर प्रकाशचंद जैन (वय ३३) हे सोन्याचे व्यापारी असून त्यांचे रथगल्लीत सराफा दुकान आहे. मयूर जैन यांना ७ जानेवारी रोजी सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास ७७४४० ४५८०४ या क्रमांकावरून फोन आला. मी शिवशक्ती रुग्णालयातून असिस्टंट डॉ. एस. के. जैन बोलत असून माझ्या घरी कार्यक्रम असल्याने मला एक तोळा सोन्याची चेन हवी आहे. चेन घेवून आपण शिवशक्ती रुग्णालयात या. तसेच आल्यावर पैसे देतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर मयूर जैन यांनी दुकानातील कारागीर मंगेश याला सोन्याची चेन घेऊन रुग्णालयात पाठवले. मंगेश रुग्णालयात दाखल होताच मीच असिस्टंट डॉ. एस. के. जैन असून पैसे कॅबिनमधून घेऊन येतो, असे सांगून त्या भामट्याने धूम ठोकली. या प्रकरणी मयूर जैन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा :