⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जप्त वाळू वाहतुकीचा दंड न भरल्यास होईल मालमत्ता जप्त ; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

जप्त वाळू वाहतुकीचा दंड न भरल्यास होईल मालमत्ता जप्त ; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान, जळगाव शहरामध्ये अवैध प्रकारे होणारी वाळूची वाहतूक वाढली आहे. महसूल पथकाकडून कारवाई होऊनसुद्धा दंड वसूल होत नाही. आता याबाबत जिल्हा प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेतला आहे.

नेमका काय निर्णय घेतला?
वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाची मालमत्ताच आता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले जिल्हाधिकारी मित्तल?
काही दिवसांपासून वाळूच्या अवैध वाहतूकप्रकरणी महसूलच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईत वाहन जप्त केले जाते. मात्र, या वाहनांना आकारण्यात येणार दंड भरला जात नाही. त्यामुळे अशी वाहने जप्तीच्या ठिकाणी पडून राहतात; पण दंड वसूल होत नाही. आता त्यावरही प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाळूचे वाहन जप्त केल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाईल. या नोटिस नंतरही त्याने दंड भरला नाही तर त्याच्या मालमत्तेवर बोजे बसवून ती शासनजमा केली जाईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.

रावेर येथील मोहन बोरसे नामक वाहनमालकाला अशाच आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याने दंड न भरल्याने त्याच्या मालमत्तांवर बोजे बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. रावेर येथील कारवाई यशस्वी झाल्यास जिल्हाभरात याच निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.