⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | दहिगावच्या ४० वर्षीय प्रौढाला तब्बल १३ वेळा सर्पदंश

दहिगावच्या ४० वर्षीय प्रौढाला तब्बल १३ वेळा सर्पदंश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील ४० वर्षीय प्रौढाला २५रोजी गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असताना सर्पदंश झाला. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीला यापूर्वी तब्बल १२ वेळा सर्पदंश झाला असून बुधवारची १३वी वेळ आहे.

दहिगाव येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) (वय ४०) यांना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. ही व्यक्ती गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत होती. लघुशंकेसाठी तेथील सार्वजनिक शौचालयात गेल्यावर त्यास सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात येताच मिस्तरी यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व सहकाऱ्यांनी उपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याच मिस्तरी यांना यापूर्वी एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ सात महिन्यांच्या काळात तब्बल १० वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील हा चर्चेचा विषय ठरला होता.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह