Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी २२ वर्षीय तरूणाने ठाणे येथे आत्महत्या केली. हा तरूण ठाणे येथे गोदरेज कंपनीत नोकरीस होता व तो ठाणे येथील वर्तक नगरात मामाच्या घरी राहत होता. मामाच्या घरी त्याने गळफास घेतला. गणेश अनिल निंबायत असे या तरूणाचे नाव असुन आत्महत्या पुर्वी त्याने सुसाइड नोट लिहून निराशा व्यक्त केली होती. चुपचुपके रोया मेरी परेशानी छुपा के, हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके अशी त्याने सुसाईड नोटची सुरुवात करीत पुढे इंग्रजीत लिहिले होते.
किनगाव बुद्रुक ता.यावल येथील रहिवासी गणेश अनिल निंबायत वय २२ हा तरूण ठाणे (मुबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता व तो वर्तक नगरात आपल्या मामाच्या घरी रहत होता. दरम्यान, या तरूणाने बुधवारी पहाटेपुर्वी मामाच्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. कामाला होता त्याने गळफास घेण्याअगोदर चिठ्ठी लिहली यात मी एक जवाबदार मुलगा होवु शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवु शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली असुन आपला एक बेजावबदार मुलगा असे सांगत त्यांने आत्महत्या केली.
मयताच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे त्याचा मृतदेह रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले. त्याच्या अशा आत्महत्या मुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाचे सुसाईड नोटमध्ये चुपचुपके रोया मेरी परेशानी छुपा के, हर चेहरे के आगे थक चुका हू मुस्कुराके.. अशी सुरवात करीत सामान्य कुटुंबातील या तरूणाने इंग्रजी भाषेत सुसाइड नोट लिहत आपण जवाबदारी पार पाडू शकलो नाही असे सांगत एक पक्षीचे चित्र रेखाटून तुमचा पक्षी उडाला असा संदेश कुटुंबास दिला आहे.