आईने हातून मोबाइल घेल्याने संतप्त झालेल्या १२ वर्षीय मुलीने संपविले जीवन ; जळगावातील धक्कादायक घटना

जानेवारी 15, 2024 8:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 15 जानेवारी 2024 : जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलीच्या हातून मोबाइल घेत तिला अभ्यास करण्याचे सांगताच संतप्त झालेल्या १२ वर्षीय मुलीने थेट गळफास घेत आत्महत्या केली.

IMG 20240115 083346 jpg webp

ही घटना रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत घडली. पद्मश्री ऊर्फ परी भरत पाटील असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शिक्षक भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची १२ वर्षांची मुलगी पद्मश्री ही मोबाइल खेळत असताना आईने तिच्याजवळील मोबाइल घेत अभ्यास करण्यास सांगितले. याचा राग आल्याने पद्मश्री हिने दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील झोक्याच्या कडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

अन् कुटुंबीयांना बसला धक्का…
रागाच्या भरात गेलेली पद्मश्री बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले. दरवाजा ठोठावूनदेखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीयांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असता त्याठिकाणी तिला मयत घोषित केले. दरम्यान, पदद्मश्री ही इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती अभ्यासातदेखील हुशार होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now