⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

युवकांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू : नातेवाईकांचा तहसिल कार्यालया समोर ठिय्या

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | 18 रोजी रात्री 11 वाजता अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या नातलगांनी व शहरातील विविध पक्ष संघटनांनी वाळू ठेकेदार कडून मृतांचा नातलगांना नुकसान भरपाई मिळावी या मागणी साठी तहसीलदार यांच्या दलना समोर ठिय्या मांडला होता . वाळू ठेक्यातून जास्त वाहतूक झाली असून ठेका बंद करा, नाहीतर  जोवर न्याय मिळत नाही तोवर मृतांचे श्ववविच्छेदन करणार नाही . अशी संतप्त भूमिका घेण्यात आली .

 यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी , सुनील देशमुख, जगन भोई, संतोष महाजन, रामा पवार, दादाभोई, सुधीर अहिरे, मिलिंद अहिरे, सुभाष अहिरे, रवी सोनावणे, महेंद्र भोई , युवराज भोई यासह टोणगाव येथील असंख्य महिला पुरुष ठिय्या मांडून होते . दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक उतेकर , तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी मृतांचा शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्याच्या सूचना दिल्या . दुपारी मृतांचा नातलंग व ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली . सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास तिघांवर शवविच्छेदन होऊन सायंकाळी 5 नंतर मृतांवर शोकमय वातावरणात अंत्यविधी करण्यात आला .

भडगाव कोटली रोड येथे रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळू उपसा करण्यासाठी जाणारे ट्रॅक्तर पलटी होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 18 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास भडगाव ते वडधे फाट्या दरम्यान घडली होती. यात 3 युवकांचा ट्रॅक्तर खाली दबून मृत्यू  झाला. तर 3 जखमी झाले आहे. मृतांमध्ये  सुरेश अशोक शिंदे वय 27 रा. टोणगाव , रवी सुरेश शिंदे वय 25 , मयूर भोई वय 21 रा आझाद चौक भडगाव अशांचा समावेश आहे.  त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले .तर शामराव शिंदे वय 23 , आकाश रामकृष्ण पवार , वय21, कैलास पवार वय 21 सर्व राहणार टोणगाव भडगाव हे जखमी झाले आहे . त्यांच्यावर समर्पण हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आला . घटनेचा पोलिसांनी पांचनाम केला असून पोलीसात उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल नव्हता. 

गरीब लोकांना न्याय भेटला पाहिजे , नाहीतर ठेका चालू देणार नाही , वाळू ठेका चुकीचा सुरु असून त्यात अनेक नियम धाब्यावर बसवले आहे . त्याविरोधात आम्ही उपोषण करू , असा पवित्रा तहसीलदार मुकेश हिवाळे व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या समोर आंदोलनकर्त्यांनी घेतला . यावेळी शांततेत बोलून मार्ग निघेल, आधी मृतांचा अंत्यविधी करावा अशा सक्त सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी दिल्या नंतर तहसील कार्यालयातील गर्दी कमी झाली. सुमारे 2-3 तास येथिल बाहेरील परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. —-शहरात रात्रीची मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे . त्यावर नाममात्र कार्यवाही होते . जादा वाहतुकी मुळे अनेक ठिकाणी रस्ते गड्डे पडून खराब झाले आहे. रात्रीचे वाहने बेरुमार वेगाने हाकण्यात येतात . लायसन्स चा मोठा मुद्दा असून अनेक चालक विना लायसन्स आहेत . वाळू उपसातुन नियमित वादविवाद होतांना दिसतो. शहरात रात्र वाळू चोरीला रोख लावण्याचे आवाहन महसूल विभागा समोर आहे.