---Advertisement---
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रातील दोन दिवसाचा हवामान अंदाज! मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, जळगावात कशी राहणार स्थिती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२४ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अद्यापही अवकाळी पावसाचे संकट कायम असून यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवसाचा अंदाज जाहीर केला आहे. दक्षिण कोकणसह उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड ठाणे मुंबई पालघर आणि रत्नागिरीला उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

Two day weather jpg webp

आज या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव, जालना, परभणी, लातूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, बीड, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) असा इशारा देण्यात आला आहे

---Advertisement---

उद्या बुधवारी या जिल्ह्यांना इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव, जालना, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा (५०-६०किमी प्रतितास वेग) असा इशारा देण्यात आला आहे

जळगावातही पावसाची हजेरी
दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसता अधूनमधून जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. रविवारी रात्री १ नंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी ४२-४३ अंशावर गेलेला पारा ढगाळ वातावरणामुळे घसरलेला दिसून आला. उद्या बुधवारी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---