भुसावळात 32 वर्षीय युवकाची आत्महत्या

मे 26, 2021 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । भुसावळ शहरातील आनंद नगरामधील रहिवासी असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रीतेश शंभु राठोड (वय 32) असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

crime

याबाबत असे की, शहरातील आनंद नगरातील रहिवासी रीतेश राठोड हे त्यांच्या वडीलांसोबत कन्ट्रक्शनचे काम करीत होते. मात्र सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी वडिलांना बोलासण्यासाठी पाच वर्षीय मुलगी प्रियंका गेल्यानंतर ते काहकी बोलत नाहीत, असे मुलीने घरच्यांना सांगताच घरच्यांनी धाव घेतली असता गळफास घेतल्याचे घटना उघडकीस आल्याने कुटुंबियांनी आक्रोश केला. डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात राठोड यांना हलवल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी विक्की राठोड यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now