आई शिवमहापूराण कथेला ; घरी असलेल्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल

डिसेंबर 11, 2023 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२३ । आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. महेश छगन गोसावी (वय ३६, रा. नवीन कुसुंबा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

succied fashi jpg webp

महेश छगन गोसावी हा कुसुंबा येथे आई,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह वास्तवास आहे. तो जळगाव मधील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये राज सिल्वर पॅलेस येथे एका सुवर्ण व्यापाराकडे तो काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान आज सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तरुणाची आई ही वडनगरी येथे महाशिवपुराण कथा येथे गेली होती.

कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. तातडीने महेश गोसावी याला कुटुंबीय व मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तिथे त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now