झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; जळगावातील घटना

ऑक्टोबर 21, 2023 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरातील मेहरूण जवळील वनीकरण विभागातील झाडाला गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. हा प्रकार आज शनिवारी उघडकीस आला असून ठाकूर हरि राठोड (वय-४५) असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

farmer succied 1 jpg webp

मेहरूण परिसरातील एकनाथ नगरात परिवारासह वास्तव्यास असलेले ठाकूर हरि राठोड हे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरांना चारा आणायचा असल्याने त्यासाठी ते वनीकरण विभागाकडे गेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी या परिसरात काही गुराखी गेले असता त्यांना ठाकूर हरी राठोड यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्याविषयी त्यांनी इतरांना माहिती दिली. काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना या विषयी कळविले. त्या वेळी पोलिस नाईक मुदस्सर काझी हे घटनास्थळी पोहचले व नागरिकांच्या मदतीने राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिवदास नाईक, फिरोज तडवी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी कमलाबाई, तीन मुले, एक सून असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now