⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | महिला पोलीस जागृती काळे यांची ‘ऑल इंडीया पोलीस गेम’मध्ये बाजी!

महिला पोलीस जागृती काळे यांची ‘ऑल इंडीया पोलीस गेम’मध्ये बाजी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । हरियाणा येथील मधुबनमध्ये दि.४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ७२ व्या ऑल इंडीया रेसलींग पोलीस क्लस्टर गेम २०२३ यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडुन ५५ किलो वजनी गटात जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस प्रशिक्षक जागृती काळे महाजन यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत बॉडीबिल्डींग या खेळ प्रकारात पुर्ण भारत भरामधुन कांस्य पदक पटकाविले आणि जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले तसेच महिला बॉडीबिल्डींग या महाराष्ट्र पोलीस संघाचे चॅम्पीयन्स ट्रॉफी पटकाविली.

जागृती काळे यांच्या या यशाबददल पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना त्यांचे सहकारी संपुर्ण वेलफेअर विभाग यांनी मार्गदर्शन केले. काळे यांना प्रशिक्षक पोहेकॉ धनराज गुळवे (पोलीस जिम प्रशिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.