तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 24 मे रोजी ऑनलाईन आयोजन

मे 21, 2021 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्युज | २१मे २०२१ |- समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.

त्याअनुषंगाने या महिन्यातील तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 24 मे, 2021 रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील महिलांनी त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या [email protected] या मेलवर, रावेर तालुक्यातील महिलांनी [email protected] या मेलवर, चाळीसगाव तालुक्यातील महिलांनी [email protected] या ईमेलवर, जामनेर तालुक्यातील महिलांनी [email protected] या मेलवर तर मुक्ताईनगर तालुक्यातील महिलांनी आपल्या तक्रारी [email protected] या मेलवर पाठवाव्यात. असे संबंधित तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now