दारूचा नशेत तरूणाने घेतला गळफास ; यावल येथील घटना

मे 19, 2021 10:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ । यावल तालुक्यातील मावेल गावाजवळील दगडी येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हातभट्टी मुळे तरूण व्यसनाधीन होत असल्याचे संतप्त महिला आंदोलनाच्या तयारीत आहे

crime

सविस्तर माहिती अशी की विजय वसंत ठाकरे (वय ३५) रा. दगडी मनवेल ता. यावल हा तरूण आपल्या आई वडिलांना सह पत्नि व दोन मुलीसह राहतो. विजय आज सकाळी राहत्या घरात कोनीही नसतांना दारूच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले आहे. गावात सुरू असलेल्या अवैध धंदे हातभट्टी दारूच्या आहारी जाऊन अनेक तरुण हे व्यासपीठ होत असलेल्याने अनेक मोलमजुरी करणा-याचे घर उद्ध्वस्त होत असून गावातील दारू बंन्दी झाली पाहिजेत असे संतप्त भावना परिसरातील शेकडो महिलांकडून व्यक्त केले जात आहे हात भट्टी दारूचे धंदे तात्काळ बंद न झाल्यास महिला वर्ग आंदोलनाच्या तयारीत आहे

मयताच्या पक्ष्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. यावल पोलिस ठाण्यात अकस्मात  म्रुत्युची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून म्रुत्युदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now