⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | या समाजाचा मोठा निर्णय ; प्री-वेडिंग फोटोशूटसह या प्रथा बंद करणार

या समाजाचा मोठा निर्णय ; प्री-वेडिंग फोटोशूटसह या प्रथा बंद करणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । भुसावळ सुवर्णकार समाजाचा गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ व ज्येष्ठ नागरिक सुवर्ण सन्मान हा कार्यक्रम व्यंकटेश बालाजी मंदिर, पांडुरंग टाकीज मागे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, शिल्ड व बुके देऊन सत्कार करण्यात आला. सोबत समाजातील जेष्ठ व पितृतुल्य समाजसेवक मधुकर लक्ष्मणशेठ वानखेडे, छगन विश्वनाथशेठ सोनी, विकास दत्तात्रयशेठ यावलकर, ग.भा.विमलबाई काशिनाथशेठ गोंडगावकर, ग.भा. शोभाबाई शांतारामशेठ भामरे, सौ उषाबाई मुरलीधरशेठ सोनार, सौ सुशिलाबाई नामदेवशेठ अहिरराव यांचा ‘सुवर्ण सन्मान’ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. मयुरी सोमनाथ बागुल, एमबीबीएस उत्तीर्ण. डॉ.सर्वेश संजय सोनार, बीएचएमएस उत्तीर्ण. श्री सुनील दिगंबरशेठ सोनगिरे एल.आय.सी . विकास अधिकारी म्हणून नियुक्ती बद्दल, श्री प्रशांत निळकंठ सोनार महाराष्ट्र पोलीस संघातर्फे बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय पदक मिळवल्याने यांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की अजूनही आपला समाज शिक्षणात खूप मागे आहे. इतर समाजाच्या तुलनेत आपण कुठेतरी कमी पडत आहोत. दर्जेदार शिक्षणावर भर द्या. आपली व परिवाराची उन्नती साधा. शिक्षित, सुसंस्कृत व उन्नत समाज घडवण्यासाठी शाखीय भेदभाव न करता एकसंघ समाजाची निर्मिती करा.

अध्यक्षीय भाषणात प्रा. सुनील सोनार सरांनी समाजात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथे विषयी जागृती केली. मुला मुलींच्या विवाह बद्दल चिंता व्यक्त केली. यात दोषी कोण हे समजण्यास असमर्थता दाखवली. विवाह योग्य मुला-मुलींच्या अपेक्षांची यादी खूप मोठी आहे. अपेक्षा व परिस्थिती यात अंतर व तफावत असून देखील मोठमोठी स्वप्न बघितले जातात. यामुळे विवाह जुळण्यास वेळ लागत आहे. कधीकधी तर पश्चातापाची वेळ येते. आंतरजातीय विवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.तारुण्याच्या उंबरठ्यावर शेवटची पायरी चढत असताना विवाहयोग जुळून येतात. पण तेही दीर्घकाळ टिकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यावर समाजाने विचार मंथन केले पाहिजे. मुलीसह मुलीच्या परिवाराचा हस्तक्षेप वाढत आहे. यामुळे क्लेश निर्माण होतात, टोकाची भूमिका घेत घटस्फोटाची वेळ येते. समाजाच्या निदर्शनास असे प्रकार वाढत आहेत.

मागील वर्षी सर्व समाज बांधवांनी सर्व संमतीने सर्वांच्या साक्षीने तीन ठराव मंजूर केले होते. प्रथम ठराव, गंध मुक्ती कार्यक्रमाला टॉवेल टोपी आणू नये. दुसरा ठराव शुभकार्यात आहेर न देता रोख रक्कम देणगी द्यावी व तिसरा ठराव, विधवा चालीरीती व कुप्रथा बंद करण्यात याव्यात.विधवा स्त्रियांविषयी हा सन्मानाचा, समानतेचा व जिव्हाळ्याचा मुद्दा होता. कपाळाचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवे काढणे या अशा अनिष्ट प्रथा बंद करणे. या तीनही ठरावावर भुसावळ सुवर्णकार समाजात मोठ्या प्रमाणावर बदल व अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. समाज प्रगतीच्या व उन्नतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही बाब अभिनंदननी आहे.

सदर बक्षीस समारंभातील कार्यक्रमात एक नवीन ठराव सर्व समाज बांधवांच्या वतीने व साक्षीने संमत करण्यात आला तो म्हणजे ‘प्री-वेडिंग फोटोशूट बंद करणे’. या फोटोशूट मुळे विवाह जुळवण्यापेक्षा ,मोडण्याचे प्रमाण वाढले आहे.मुला मुलींमध्ये तात्काळ गैरसमज निर्माण होऊन टोकाची भूमिका घेत लग्न मोडले जात आहेत म्हणून प्री-वेडिंग फोटो शूट ही प्रथा बंद झाली पाहिजे.

लग्न समारंभ हा टी ट्वेंटी व वन डे क्रिकेट खेळासारखा असला पाहिजे. एका दिवसात सर्व विवाहविधी आटोपला पाहिजे. या मुळे आर्थिक भार कमी होईल. कर्ज काढून लग्न करण्यापेक्षा अल्पशा समाज बांधवांच्या साक्षीने लग्न आटोपले पाहिजे. कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करत माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे याचे मूल्यमापन करून विवाहाचे नियोजन करावे अशी आग्रहाची विनंती समाज बांधवांना करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण मोरे सर. प्रास्ताविक प्रा.श्याम दुसाने सर यांनी तर आभार श्री.नारायण घोडके सर यांनी केले.अनेक समाज बांधवांनी आपल्या स्वर्गीय पूर्वजांच्या पित्तर्थ अन्नदानासाठी देणगी देऊन समजास उपकृत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.