जळगाव लाईव्ह न्यूज| २३ जुलै २०२३| भुसावळ शहरात तृतीयपंथीयांवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ३२ वर्षीय तृतीयपंथीवर पाच जणांनी मारहाण करत अनैसर्गिक कृती करत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २२ जुलै सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरात ३२ वर्षीय तृतीयपंथी रहिवासाला आहे. भिक्षा व जोगवा मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. ३१ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता तिच्यावर पाच जणांनी केस ओढून अनैसर्गिक रित्या अत्याचार केला. त्यानंतर तिच्यावरील दिड हजार आणि दररोज ७०० रुपयांचा खंडणीचा वाटा दिला नाही म्हणून मारहाण केली. तर जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली.
मारहाण करण्यामध्ये ३ पुरुष, १ महिला आणि १ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. दरम्यान तृतीयपंथीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आहे. तृतीयपंथीने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात २२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.