जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । आधीच भुसावळहुन धावणारी भुसावळ-पुणे गाडी इगतपुरीपर्यंतच करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यात आता भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत ही मेमू गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
01135 / 01136 भुसावळ -दौंड- भुसावळ मेमू साप्ताहिक विशेष ट्रेनचा प्रवाशांसाठी उपयुक्त असल्याने काेविड -19 च्या काळानंतर देखील ट्रेनची संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल न करता ती चालविण्यासाठी मुदत वाढ मिळाली हाेती. त्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला हाेता.
मात्र, आता भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्दकरण्यात आली आहे. ही मेमू सेवा प्रामुख्याने पुणे विभागाच्या मेमू रेकच्या नियोजित देखभालीसाठी चालविण्यात आली होती मात्र ही ट्रेन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने आता मात्र प्रवाशांचे हाल होणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस धावत होती. मात्र मागील अनेक महिन्यापासून रद्द करण्यात आली असून ती इगतपुरी पर्यंत चालविली जात आहे. हुतात्मा एक्सप्रेस ही जळगाव, मनमाड नाशिक, इगतपूर, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे जात असलयाने धावत होती. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत होता. मात्र ती रद्द असल्याने प्रवाशांची चांगलीच हिरमोड होत आहे.